मांसाहार न करणार्या महिला पत्रकाराला कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले

बेंगळुरू (कर्नाटक) – मांसाहार न करणार्या एका महिला पत्रकाराला कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘तुम्ही आयुष्यात काहीतरी गमावत आहात’, असे म्हटल्याचे समोर आले आहे.
सिद्धरामय्या हे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या निवसास्थानी न्याहारीसाठी नुकतेच गेले होते. नाश्ता केल्यानंतर या दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका महिला पत्रकाराला ‘तुम्हाला चिकन आवडते का?’, असे विचारले. यावर महिला पत्रकाराने ‘मी शुद्ध शाकाहारी आहे’, असे उत्तर दिले. यावर सिद्धरामय्या यांनी पुन्हा त्यांना विचारले ‘शुद्ध म्हणजे काय? तुम्ही अंडी खाता का?’, यावर महिला पत्रकाराने ‘नाही’ म्हटले. तेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘तुम्ही आयुष्यात काहीतरी गमावत आहात’, असे विधान केले. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या पत्नी उषा यांनी मुख्यमंत्र्यांसाठी पारंपरिक नाटी कोळी (देशी चिकन) बनवले होते. त्यावरून हा प्रसंग घडला.
संपादकीय भूमिकाज्यांना केवळ ‘खाण्यातच’ रस आहे, त्यांच्याकडून यापेक्षा वेगळ्या वक्तव्याची अपेक्षा काय वाटणार ? |
(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !
कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी करा ! – महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश