
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणार्या ध्वजाचा आकार, प्रकार आणि रंग निश्चित झाला आहे. २५ नोव्हेंबरला होणार्या ध्वजारोहण सोहळ्यात श्रीराममंदिराच्या १९१ फूट उंच शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिकोणी आकाराचा भगवा ध्वज फडकवतील. हा ध्वज ११ फूट रुंद आणि २२ फूट लांब असेल. त्यावर सूर्यवंशाचे चिन्ह असणार आहे. हा निर्णय श्रीराममंदिराच्या धार्मिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ध्वजारोहण सोहळ्यात सुमारे ८ ते १० सहस्र पाहुणे सहभागी होतील. ही सूची अंतिम केली जात आहे.
घाटांचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात
उत्तरप्रदेश पर्यटन निगमच्या देखरेखीखाली घाटांचे सौंदर्यीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्येक घाटाच्या प्रवेशद्वारावर त्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगणारे शिलालेख बसवले जात आहेत. यामुळे भक्त आणि पर्यटक यांना येथील परंपरा, कथा आणि संस्कृती समजू शकेल. घाटांच्या भिंती आणि पायर्या यांच्यावर आधुनिक प्रकाशयोजना केली जात आहे, जी रात्री शरयू नदीच्या तटाला सुवर्ण आभा देईल.
भक्तांसाठी सुविधा
‘राम की पैडी’पासून लक्ष्मण घाटापर्यंत सजावटीचे काम चालू आहे. प्रत्येक ३०० मीटरवर एक छत्री उभारली जात आहे, जिथे भक्त विश्रांती घेऊ शकतील. भाविकांकरता बसण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना, स्वच्छतागृहे, कपडे पालटण्यासाठी खोल्या, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उभारल्या जात आहेत. उर्वरित सर्व काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार दीपोत्सवाच्या वेळी शरयूच्या तीरावर लाखो दिव्यांच्या प्रकाशात सजलेले हे घाट अयोध्येची नवी ओळख ठरतील. भक्त रामनगरीच्या भक्तीत न्हाऊन निघतील, तर पर्यटक येथील स्थापत्यकला आणि दिव्यता यांचे साक्षीदार बनतील.
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !