
कोल्हापूर, ४ ऑक्टोबर – मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी नृसिंह सरस्वती देवस्थान, नृसिंहवाडी यांच्याकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. (महाराष्ट्रावर जेव्हा संकट येते, तेव्हा हिंदूंची देवालये, मंदिरे मोठ्या प्रमाणात पूरग्रस्तांना निधीसह पाणी, अन्नपदार्थ, तसेच सर्वप्रकारचे साहाय्य करतात ! अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमधून असे साहाय्य का केले जात नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य हिंदूंना पडतो ! – संपादक) हा धनादेश संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ जिल्हाकक्षाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत परुळेकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याकडे सुपूर्द केला. याव्यतिरिक्त हुपरी येथील ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ यांच्याकडून १५ सहस्र रुपयांचा धनादेशही या निधीसाठी प्राप्त झाला.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव