चीनवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात उणावणार !

जयपूर (राजस्थान) – राज्यातील नागौर जिल्ह्यात लिथियमचा तब्बल १ कोटी ४० लाख टन साठा सापडला आहे. या धातूचा वापर भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, विद्युत् वाहने यांची बॅटरी, तसेच पुनर्भरणीय (रिचार्जेबल) बॅटरी यांचे उत्पादन करण्यासाठी केला जातो. यामुळे आता राजस्थानचा महसूल वाढण्यासह रोजगाराच्या संधीही प्रचंड प्रमाणात वाढतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियमचा साठा सापडल्यामुळे भारताची लिथियमची ८० टक्के मागणीची पूर्तता होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे. याआधी जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा ५० लाख टन साठा सापडला होता.
लिथियम उत्खननासाठी लिलाव प्रक्रिया चालू !
नागौरच्या डेगाना भागात लिथियम साठा मिळाल्यामुळे भारताची चीनवरील अवलंबित्व संपणार आहे. रेवंत पर्वतरांगांमध्ये सापडलेला हा साठा तब्बल १ सहस्र ४०० किलो एवढा असल्याचा अनुमान आहे. केंद्रीय खनन मंत्रालयाने लिथियम उत्खननासाठी लिलाव प्रक्रियाही चालू केली असून अर्ज घेण्याचा अंतिम दिनांक १ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आला आहे.
लिथियम धातूविषयीची माहिती !

लिथियम हा अत्यंत हलका धातू आहे. हवेतील प्राणवायूच्या तो संपर्कात येताच पेट घेतो. लिथियम मऊ, चांदीसारखा पांढरा आणि तेजस्वी असतो. यामुळेच त्याला ‘पांढरे सोने’ म्हटले जाते.
CBI Arrests Pradeep Kumar : हरियाणा : निवृत्तीच्या काही घंटे आधीच आय.ए.एस्. अधिकार्याला ‘सीबीआय’ कडून अटक !
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !
कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी करा ! – महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश
POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !
सिंधु जल वाटप करारावर पाकने अणू धोरण पालटून अणूबाँबचा वापर करावा ! – Bilawal Bhutto