Naxal Free Districts : महाराष्ट्रातील ४ जिल्हे नक्षलमुक्त ! – महाराष्ट्र शासनाची घोषणा

गोंदिया आणि गडचिरोली अद्यापही नक्षलग्रस्त !

मुंबई, २७ जून (वार्ता.) –  महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, नांदेड आणि यवतमाळ या ४ जिल्ह्यांतील नक्षलवाद संपुष्टात आला आहे, अशी अधिकृत घोषणा राज्यशासनाकडून करण्यात आली. गोंदिया आणि गडचिरोली या २ जिल्ह्यांत मात्र अद्यापही नक्षली असल्याचे सरकारने घोषित केले आहे. राज्याच्या गृहविभागाने २७ जून या दिवशी शासन निर्णयाद्वारे याविषयीची माहिती दिली.

१. वर्ष २००४ मध्ये गृहविभागाने गडचिरोली हा संपूर्ण जिल्हा, तसेच गोंदियामधील तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, देवरी आणि अर्जुनी मोरगाव हे तालुके नक्षली असल्याचे घोषित केले होते.

२. चंद्रपूरमध्ये चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवली, बल्लारपूर, पोंभूर्णा, मूल आणि सावली, हे तालुके नक्षलग्रस्त असल्याचे घोषित केले होते. भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखणी, लाखादूर हे तालुके, तर नांदेडमधील किनवट तालुका नक्षलग्रस्त असल्याचे घोषित केले होते.

३. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाच्या विरोधात घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे केंद्र आणि राज्य स्तरावरील यंत्रणांनी नक्षलग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली.

४. महाराष्ट्र शासनाने २० वर्षांनी नक्षलग्रस्त सुधारित ठिकाणे घोषित केली आहेत. त्यानुसार सद्यःस्थितीत महाराष्ट्रात गडचिरोली हा संपूर्ण जिल्हा, तर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी आणि अर्जुनी मोरगाव हे तालुके अद्यापही नक्षलग्रस्त आहेत.