
अहिल्यानगर – श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थानाच्या यात्रेच्या वेळी येथील ग्रामस्थ आणि भाविक ज्या परंपरांचे पालन करतात, त्या परंपरा पायदळी तुडवणे, धार्मिक यात्रेत जुगार-सट्टा असे अवैध धंदे करणे, महिला भाविकांची छेड काढणे, भाविकांना मारहाण करणे, असे गैरप्रकार हे उद्दाम धर्मांध व्यावसायिक गेली अनेक वर्षे करत असल्याचे भाविकांनी सांगितले. श्री कानिफनाथ देवावर श्रद्धा नसणार्या; पण केवळ आर्थिक लाभासाठी धार्मिक यात्रेत येऊन असे गैरप्रकार करून यात्रेचे पावित्र्य भंग करणार्या, तसेच भाविकांना त्रास देणार्या धर्मांध व्यापार्यांवर बंदी घालणेच सर्वथा योग्य आहे. ७०० वर्षांची परंपरा असणार्या श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान, मढी येथील यात्रेत यंदा धर्मांध व्यापार्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अत्यंत योग्य असून असा निर्णय घेणार्या मढी ग्रामस्थांचे महाराष्ट्र मंदिर महासंघाने अभिनंदन केले. अनेक राज्यांत असे अनुभवायला आले आहे की, बर्याच मंदिर परिसरांत फुलवाले धर्मांध मुसलमान असतात. आपण सामाजिक माध्यमांद्वारे अनेक व्हिडिओ पाहिले असतील की, ज्यामध्ये थूँक (थुंकी) जिहाद करून अर्थात् फुले-फळे यांना थुंकी लावून त्याची भक्तांना विक्री केली जाते. धर्मांधांची थुंकी लागलेली फळे-फुले देवतांना वाहिली जातात, तसेच काही वेळा त्याच फुलांचा हार देवतेच्या गळ्यात घातला जातो. धर्मांध हे एक ‘अजेंडा’ म्हणजे नियोजित षड्यंत्र रचून कार्य करत आहेत. बर्याच ठिकाणी स्वतःची ओळख लपवून, वेळप्रसंगी खोटी ओळख दाखवून ते भाविकांची लूट करतात. असे अनेक गैरप्रकार देशपातळीवर अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे मढी ग्रामस्थांचा आदर्श घेऊन सर्वत्रच्या धार्मिक क्षेत्रातील ग्रामस्थांनी असा निर्णय घेऊन यात्रेचे पावित्र्य राखावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.
संपादकीय भूमिका :मढी यात्रेचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मांध व्यापार्यांवर बंदी घालणार्या ग्रामस्थांचे अभिनंदन ! |