Delhi New CM Rekha Gupta : रेखा गुप्ता यांनी घेतली देहलीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा यांच्यासह ६ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

डावीकडून उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता

नवी देहली – येथील रामलीला मैदानात देहलीच्या भाजप सरकारच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचा शपथविधी झाला. या वेळी उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा आणि अन्य ५ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यांमध्ये आशिष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रवींद्र इंद्रराज सिंह, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंह यांचा समावेश होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींचा समावेश होता.

८ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येतील ! – रेखा गुप्ता

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आश्वासन दिले की, त्यांचे सरकार महिलांना प्रतिमहा २ सहस्र ५०० रुपये साहाय्य देण्याचे वचन पूर्ण करेल. मासिक साहाय्याचा पहिला हप्ता ८ मार्चपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.