रामनाथी आश्रमात आल्‍यावर साकूर (यवतमाळ) येथील कु. वल्लभ पांडे (वय १५ वर्षे) याच्‍यात झालेले पालट

‘५.५.२०२४ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात आलो होतो. आश्रमात येण्‍याआधी मला घरी कामे करण्‍याचा कंटाळा यायचा, उदा. घरातील जळमट काढणे, प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता करणे, घेतलेली वस्‍तू जागेवर परत न ठेवणे इत्‍यादी. आश्रमात आल्‍यावर मला झालेले लाभ येथे दिले आहेत.

१. रामनाथी आश्रमात आल्‍यावर खोलीची स्‍वच्‍छता करतांना शिकायला मिळालेली सूत्रे  

आश्रमात आल्‍यानंतर मला खोलीची स्‍वच्‍छता करण्‍याची सेवा मिळाली. त्‍या सेवेत मी पलंगावरील चादरीची घडी चुकीच्‍या पद्धतीने केली होती. तेव्‍हा तिथे सेवा करत असलेले श्री. हर्ष गोसावी यांनी ‘मला पलंगावरील चादरीची घडी कशी करायची ?’, हे शिकवले, तसेच ‘प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता कशी करायची ?’, हे मी कु. वल्लभ जोशी (आध्‍यात्मिक पातळी ५६ टक्‍के, वय १६ वर्षे) यांच्‍याकडून शिकलो.

२. आश्रमात आल्‍यावर झालेले लाभ

अ. माझ्‍यात असलेला आळस आणि कंटाळा आश्रमात आल्‍यावर नष्‍ट झाला.

आ. भ्रमणभाषवर बोलतांना माझ्‍या तोंडात बर्‍याचदा ‘हॅलो’ हा शब्‍द यायचा; पण आश्रमात आल्‍यावर माझे हा शब्‍द उच्‍चारणे बंद झाले.

इ. घरी माझ्‍याकडून अधिक नामजप होत नव्‍हता; पण आश्रमात आल्‍यावर नामजप सतत होऊ लागला.

ई. ध्‍यानमंदिरात एका जागी बसून नामजप करतांना मनाला आनंद मिळत होता.

उ. मला आधी वाचन करायची अधिक आवड नव्‍हती; पण आश्रमात आल्‍यावर दुसर्‍याच दिवशी माझ्‍यात दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायची आवड निर्माण झाली.’

– कु. वल्लभ विवेक पांडे, साकूर, जिल्‍हा यवतमाळ (१८.५.२०२४)