मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधीमंडळ पक्षप्रतोदपदी रोहित पवार यांची, तर गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि शपथविधी झाल्यानंतर आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात येईल. यासाठी नवीन गठीत होत असलेल्या विधानसभेच्या सभागृहातील नेत्यांची सर्वच राजकीय पक्षांकडून नियुक्ती केली जात आहे.