अकोला येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा तरुण अटकेत !

प्रतिकात्मक चित्र

अकोला – मूर्तीजापूर येथील एका अल्पवयीन मुलीशी विशाल राऊत (वय २१ वर्षे) याने ‘फेसबुक’वर मैत्री केली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याने मुलीला फूस लावून पळवून नेले. मुलीच्या घरच्यांनी तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी दोघांना शोधले. तेव्हा मुलगी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी विशालला अटक करण्यात आली आहे.


कल्याण येथून २ अल्पवयीन मुली बेपत्ता !

कल्याण – येथून २ अल्पवयीन मुली कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका येथून बेपत्ता झाल्या आहेत. दोन्ही मुलींना अज्ञातांनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलींच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला असून मुलीचा शोध चालू आहे. एक मुलगी १० वर्षांची असून दुसर्‍या मुलीचे वय १५ वर्षे आहे. दोघी मैत्रिणी असून त्या हिंदी आणि भोजपुरी भाषा बोलतात.

संपादकीय भूमिका :

पालकांनो, आपली मुले ‘फेसबुक’वर कुणाशी मैत्री करतात, याकडेही लक्ष ठेवा !