घ्यावे लेकरा तुम्ही चरणी । 

‘मंगळुरू येथे गेल्यावर मला गुरु आणि देवता यांच्या अनुसंधानात रहाता येऊ लागले. दुसर्‍या दिवसापासून नामजप करतांना मला काही कविता सुचल्या. त्या गुरुचरणी अर्पण करण्याचा अल्पसा प्रयत्न !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अधीर मन कंपित काया ।
साद घालते कुणा ।। १ ।।

तळमळ तळमळ होई जिवाची ।
चित्त न ते स्थिर कदापि ।। २ ।।

ओढ कसली या जिवाला ।
प्राप्तव्य ते उमजे ना मजला ।। ३ ।।

श्री. धैवत वाघमारे

येई अंतरातूनी ध्वनी ।
म्हणे वेड्या कुठे पहासी ।। ४ ।।

पहा अंतरात कोण दिसे तुजसी ।
नारायणस्वरूप गुरुदेव तेथ असती ।। ५ ।।

गुरुदेव म्हणती असता मी येथ ।
भ्रांत काय तुजसी सांग ।। ६ ।।

कश्चित कारणे धरली मनी व्यथा ।
सोडोनी दे चिंता सर्वथा ।। ७ ।।

ऐकोनी साद गुरुमाऊलीची ।
निश्चिंत मन होऊनी आसवे तरळती ।। ८ ।।

घ्यावे लेकरा तुम्ही चरणी ।
नका करू विलंब आता ।। ९ ।।

कृतज्ञ आहे सदा तव चरणी ।
प्रार्थितो कृपा करावी मार्गक्रमणी ।। १० ।।

– श्री. धैवत विलास वाघमारे (६.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक