छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अनुमतीसाठी ३०० खाटांचे रुग्णालय असल्याचे खोटे शपथपत्र सादर केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी २६ सप्टेंबर या दिवशी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. खंडपिठाने सत्तार यांच्या संस्था, राज्यशासन, मेडिकल कौन्सिल, वैद्यकीय संचालक, आयुष मंत्रालय यांना नोटिसा बजावल्या आहेत.