‘२३.४.२०२४ या दिवशी, म्हणजे ‘हनुमान जयंती’च्या दिवशी पूजा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्याविषयी पुढील सूत्रे जाणवली.
१. सतत नामजप करणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे ‘प्रभु श्रीराम’ आहेत, तर पू. ‘सौरभदादा’ हनुमंत आहेत. हनुमंतराया सतत प्रभु श्रीरामाचा नामजप करत असे, तसे पू. सौरभदादा सतत नामजप करत असतात.
२. साधकांचे रक्षण करणे
हनुमंतराया प्रभु श्रीरामाचा नामजप करत सर्वांचे रक्षण करतो, तसे पू. सौरभदादा वाईट शक्तींच्या त्रासांपासून सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सतत ध्यानमग्न असतात. प्रभु श्रीरामाचे स्मरण केल्यावर हनुमंतराया रक्षणासाठी येतो, तसे साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे स्मरण केल्यावर त्यांच्या रक्षणासाठी पू. सौरभदादा सूक्ष्मातून येतात.
३. साधकांच्या प्राणाचे रक्षण करणे
हनुमंताने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी बुटी आणली, तसे पू. सौरभदादा सर्व साधकांच्या प्राणाचे रक्षण व्हावे, यासाठी नामजपरूपी संजीवनी बुटीच्या माध्यमातून अनिष्ट शक्तींशी सूक्ष्मातून लढत असतात.
४. प्रभु श्रीरामाच्या नामाने हनुमंताला आनंद होतो, तसे ‘श्रीं’चे(टीप) नाव घेतल्यावर पू. सौरभदादांना आनंद होतो.
‘हनुमान जयंती’च्या निमित्ताने पू. सौरभदादांच्या चरणी साष्टांग दंडवत !’
(टीप : पू. सौरभदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ‘श्री’ असे म्हणतात.)
– श्री. रवींद्र कुंभार, तासगाव, जि. सांगली. (२३.१.२०२४)
|