|
थिरुवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या मल्याळम् चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले आहे. यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि प्रमुख अभिनेते, अशा १५ जणांच्या टोळीचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. ‘चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीला घ्यायचे ?’, हे ही टोळी ठरवतेे’, असे केरळ सरकारने चित्रपटसृष्टीतील महिलांच्या शोषणाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधीश हेमा यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
The Malayalam film industry is ill-famed and gives tight competition to Urduwood, thanks to Sharjah Shakes. https://t.co/LPzgknQOom
— Gems of Bollywood बॉलीवुड के रत्न (@GemsOfBollywood) August 23, 2024
काय म्हटले आहे अहवालात ?
१. ‘शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सिद्ध असलेल्या तरुणींनाच चित्रपटांमध्ये काम दिले जाते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी सर्व प्रकारच्या योजनांवर आणि तडजोडींवर सहमती दर्शवावी लागते, असे एका अभिनेत्रीने सांगितले.
२. २३३ पानांचा हा अहवाल माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मल्याळम् चित्रपटसृष्टीत ‘कास्टिंग काऊच’ (चित्रपटात संधी मिळण्यासाठी अभिनेत्रींचे लैंगिक शोषण) आहे. जो कुणी सहकार्य करतो, त्याला एका गटात समाविष्ट केले जाते.
३. रात्रीच्या वेळी अभिनेत्रींच्या खोल्यांचा दरवाजा वारंवार ठोठावला जातो. त्यांनी दरवाजा उघडला नाही, तर अजून जोरजोरात ठोठावला जातो. काही प्रसंगी दरवाजाच मोडून पडेल, इतक्या जोरात तो ठोठावला जातो, असे अभिनेत्रींनी सांगितले.
४. मल्याळम् चित्रपटसृष्टी गुन्हेगार आणि महिलाद्वेष्टे यांनी भरलेली आहे. वरील १५ जणांच्या टोळीकडे त्यांच्या विरोधात आवाज उठवणार्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याची ‘क्षमता’ आहे.
गंभीर परिणाम होऊ शकतात; म्हणून पीडित अभिनेत्री पोलिसांकडे तक्रार करत नाहीत !
लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अभिनेत्री पोलिसांकडे तक्रार करण्यास नकार देतात. कुणी तक्रार केली, तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. तक्रारदारांचे तोंड बंद केले जाते. त्यांच्या कुटुंबियांनाही लक्ष्य केले जाते. (यातून केरळमधील साम्यवादी सरकारच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते ! या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संबंधित अभिनेत्रींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक)
चौकशी अहवाल साडेचार वर्षे दडपला !वर्ष २०१७ मध्ये एका चित्रपट अभिनेत्रीवर अभिनेता दिलीप याच्या गटाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. यामुळे मोठा गदारोळ झाला. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषण पडताळून अहवाल देण्यासाठी केरळ सरकारकडून हेमा समितीची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे समितीने हा अहवाल सादर केल्याच्या साडेचार वर्षांनंतर आता तो उघड करण्यात आला आहे. (इतकी वर्षे हा अहवाल का दडपण्यात आला ?, याचे उत्तर केरळमधील साम्यवादी सरकारने दिला पाहिजे. यासाठी जनतेने दबाव आणायला हवा ! इतके करूनही संबंधितांवर कारवाई होत नसेल, तर अशा चौकशी आयोगांचा काय लाभ ? यावर खर्च करण्यात आलेले पैसे वायाच जाणार ? – संपादक) |
संपादकीय भूमिका
|