कळमना (नागपूर) पोलीस चौकीत पोलीस खेळत होते जुगार !

जुगार खेळणारे पोलीस

नागपूर – येथील कळमना पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी पत्ते म्हणजेच जुगार खेळत होते. याविषयीचा व्हिडिओ समोर आला आहे. ते सिगारेट ओढत असल्याचेही त्यात दिसत आहे. पोलीस चौकीत गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडिओ चित्रीत करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला.

संपादकीय भूमिका :

पोलीसच जुगार खेळत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ? अशा पोलिसांना आजन्म कारावासाची शिक्षा करा !

पोलीस चौकीत जुगार खेळणारे पोलीस असणे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! असे पोलीस शहरातील जुगार अड्डे कधी संपवतील का ? अशांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी खटला प्रविष्ट केला पाहिजे.