भाग्यनगर (तेलंगाणा) – भाग्यनगर शहरातील एका नगराला भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे नाव देण्यात आले आहे. तेलंगाणा राज्य रस्ता वाहतूक महामंडळ, हैदराबाद मेट्रो रेल्वे आणि इतर आस्थापने हे ‘लाल बहादुर शास्त्री नगर’ ऐवजी ‘एल्.बी. नगर’ असे लिहितात. एखाद्या स्थळाला अतीमहनीय व्यक्तीचे नाव दिले असल्यास ते पूर्ण लिहिण योग्य आहे. ते ‘एल्.बी. नगर’ असे थोडक्यात लिहिणे किंवा उच्चार करणे योग्य होणार नाही, असे भाग्यनगर येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रमणामूर्ती यांनी म्हटले आहे. तेलंगाणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, हैदराबाद मेट्रो रेल्वे आणि इतर आस्थापने यांनी ‘एल्.बी. नगर’ ऐवजी ‘लाल बहादुर शास्त्री नगर’ असे संपूर्ण नाव लिहावे, अशी मागणी अधिवक्ता रमणामूर्ती यांनी केली आहे.