Muslim Girl Married Hindu : बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्‍वीकारून हिंदु तरुणाशी केला विवाह !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे झीनत (पालटलेले नाव) हिने हिंदु धर्म स्‍वीकारला आहे. झीनत आता मुनेश कुमार यांची पत्नी झाली आहे. विवाहानंतर झीनतचे नाव सीमा कश्‍यप असे नाव ठेवण्‍यात आले आहे. त्‍यांचा विवाह बरेली येथील अगत्‍स्‍य मुनी आश्रमात वैदिक पद्धतीने करण्‍यात आला.

झीनत मुरादाबाद येथील रहाणारी आहे. तिचे मुनेश यांच्‍यावर गेल्‍या वर्षभरापासून प्रेम होते. झीनतच्‍या वडिलांचा याला विरोध होता; मात्र झीनतला मुनेश याच्‍याशी विवाह करायचा होता. त्‍यामुळे ती स्‍वच्‍छेने घरातून बाहेर पडली आणि अगस्‍त्‍य मुनी आश्रमात येऊन तिने मुनेश यांच्‍याशी विवाह केला.