मुंबई – ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मधील १०० कर्मचार्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. या कर्मचार्यांमध्ये ६० शिक्षक आणि उर्वरित ४० जण शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
‘२९ जून या दिवशी १०० कर्मचार्यांना त्यांच्या रोजगार कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही’, असे ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ने सांगितले. ‘टाटा एज्युकेशन ट्रस्ट’कडून नियमित निधी न मिळाल्याचे कारण देत या कर्मचार्यांना नोकरीवरून काढले आहे, तसेच सर्व कर्मचार्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. काढून टाकण्यात आलेल्यांपैकी अनेक कर्मचारी हे वर्ष २००८ पासून या आस्थापनात कार्यरत आहेत. त्यांनी विविध अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्पही राबवले आहेत.