मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्‍या तरुणाला जमावाची अमानुष मारहाण !

मनोज जरांगे

(स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण)

छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वादग्रस्त स्टेटस ठेवणारा तरुण दीपक बद्री नागरे (वय ३५ वर्षे, रा. मुकुंदवाडी) याला जमावाने अमानुष मारहाण केल्याची घटना जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथे घडली आहे. जमावाने दीपक याला घरातून बाहेर काढत मारहाण करतच त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेले. ही घटना २८ मेच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. नागरे याने ठेवलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे मुकुंदवाडी येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दीपक विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.