सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत झटणार्‍या साधकांची आध्यात्मिक शाळा ! आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे या ठिकाणी पूर्वसिद्धता करण्यात येत आहे. आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे. पुढे सारणीत दिलेल्या आकारात उपलब्ध होतील, असे लहान-मोठ्या आकारांचे संबंधित आश्रम किंवा सेवाकेंद्रे यांना सर्व मिळून तेवढे ‘सिलपोलिन’ किंवा ‘फ्लेक्स’ हवे आहेत.


वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात अथवा सवलतीच्या दरात देऊ शकतात. नवीन, पूर्वी वापरलेले वा किरकोळ दुरुस्ती केल्यावर वापरण्यायोग्य होणारे साहित्य उपलब्ध असल्यास तेही देऊ शकतात. हे साहित्य विकत घ्यायचे असल्यास ५० सहस्र रुपयांपर्यंत व्यय येऊ शकतो. त्यासाठी धनरूपात साहाय्य करू शकत असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

साधकांसाठी सूचना

वरील साहित्य जिल्ह्यांत विनावापर पडून असल्यास संबंधित जिल्हासेवकांनी त्याची माहिती (आकार, नग, स्थिती इत्यादी) कळवावी. त्यानंतर ते कुठे आणि कधी पाठवायचे, याविषयी कळवले जाईल. त्यानुसार आश्रमात येणारे वाहन किंवा साधक यांच्यासह ते पाठवून द्यावे.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’

वरील साहित्य खरेदी करण्यासाठी अर्पणदात्यांना संपूर्ण रक्कम देणे शक्य नसल्यास ते आपल्या क्षमतेनुसार अर्पण करून या धर्मकार्यात योगदान देऊ शकतात.

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (१७.५.२०२४)