पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोल्हापूर – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे २७ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी धारकर्‍यांसह उपस्थित होते. पू. संभाजीराव भिडेगुरुजी सभास्थळी उपस्थित झाल्यावर त्यांच्यासाठी पहिल्या रांगेत जागा करून देण्यात आली. सभेनंतर पू. भिडेगुरुजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पू. भिडेगुरुजी यांच्याविषयी विशेष स्नेह असून ते पंतप्रधान होण्यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये रायगड येथील धारातीर्थ मोहिमेसाठी आले होते, तसेच पंतप्रधान झाल्यावर सांगली येथे झालेल्या सभेच्या प्रसंगीही पंतप्रधानांनी पू. भिडेगुरुजी यांची आवर्जून भेट घेतली होती.