१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक स्थिर आणि आनंदी दिसतो’, असे म्हणणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (साधकांकडे पाहून) : हा (श्री. अतुल पवार) पूर्वीपेक्षा किती आनंदी दिसतो ना ! याच्याकडे पाहून काय वाटते ?
साधक : तो स्थिर आणि आनंदी वाटतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो, (श्री. अतुल पवार यांना उद्देशून) यासाठी काय प्रयत्न केले ?
श्री. अतुल पवार : तुमच्या कृपाशीर्वादामुळेच मी स्थिर आणि आनंदी आहे.
(तेव्हा प.पू. डॉक्टरांनी स्मितहास्य केले.)
२. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी ‘माझ्या देहत्यागानंतर स्थिर होशील’, असे सांगणे
यापूर्वीच्या सत्संगातही प.पू. गुरुदेव मला ‘तू आनंदी आहेस’, असे म्हणाले होते; पण या सत्संगात ते मला ‘तू स्थिर दिसत आहेस’, असे म्हणाले. तेव्हा मला योगतज्ञ दादाजींचे वाक्य आठवले. मी योगतज्ञ दादाजींकडे सेवेला असतांना त्यांना म्हणालो होतो, ‘‘प.पू. दादाजी, मी स्थिर कधी होणार ?’’, तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मी वैकुंठाला गेल्यानंतर हळूहळू स्थिर होशील.’’ त्याप्रमाणे योगतज्ञ दादाजी यांच्या देहत्यागानंतर मी हळूहळू स्थिर होत आहे’, असे मला जाणवले.
३. गुरुतत्त्व आणि गुरुवाणी एकच असल्याचे अनुभवणे
प.पू.डॉक्टरही मला ‘तू स्थिर आणि आनंदी दिसतोस’, असे म्हणाले. यावरून गुरुतत्त्व आणि गुरुवाणी एकच असल्याचे मला पुन्हा एकदा अनुभवता आले.
४. स्वतःमध्ये जाणवलेले पालट !
अ. आता मलाही मी पूर्वीच्या तुलनेत ‘स्थिर आणि आनंदी’ आहे’, असे जाणवते.
आ. एखादा प्रसंग घडल्यानंतर प्रसंगाचा मनावर फार वेळ परिणाम न होता मला त्यातून लगेच बाहेर पडता येते.
इ. मला प्रसंगात स्थिर रहाता येत आहे.
ई. मला मधे मधे दैवी गंध अनुभवता येतो.
उ. नामजपाला बसल्यानंतर ‘माझे मन एकाग्र होत आहे’, असे मला अनुभवता येते.
ऊ. नामजप करतांना माझे ध्यान लागून मला देवतांची दर्शने होतात.
ए. मला स्वप्नातही देवतांची दर्शने होतात.
५. प्रार्थना
‘हे गुरुदेवा, ‘माझी ही चांगली स्थिती केवळ आपल्या कृपेमुळेच झाली आहे. ही स्थिती अजून वृद्धींगत होऊन चांगली साधना होऊन मला समष्टी कार्य करण्याचे बळ मिळावे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल.