असे असणार रामनवमीला श्रीरामलल्लांचे दर्शन !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – उद्या, रामनवमीनिमित्त श्रीराममंदिरात श्रीरामलल्ला यांना रत्नजडित वस्त्रे नेसवण्यात येणार आहेत. त्यांच्या कपाळावर माणिकाचे चूर्ण असलेली चंदनाची उटी लावण्यात येणार आहे. याखेरीज रामलल्ला आपादमस्तक रत्नालंकार धारण करणार आहेत. त्यांची वस्त्रे सोन्याच्या धाग्यांनी विणलेली आहेत. श्रीरामलल्ला धारण करणार्‍या दागिन्यांत मुकुट, कुंडल, हार, तिलक, बाजूबंद, हातांचे कडे, सोन्याचे तार असलेले धनुष्य आणि बाण असणार आहेत. रत्नजडित पोशाख पिवळ्या आणि गुलाबी रंगांत बनवण्यात आले आहेत.

सौजन्य DD News

१५ ते २० लाख भाविक दर्शनासाठी येणार !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की,  रामनवमीच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता दर्शन प्रारंभ होईल आणि ते दिवसभर २० घंटे मिळेल. देशभरातून किमान १५ ते २० लाख भाविक या दिवशी अयोध्येला येऊ शकतात. यामुळे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतील भाविकांनी स्वतःच्या घरीच उत्सव साजरा करावा.

राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीणकुमार म्हणाले की, १ लाख सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. १९ एप्रिलपर्यंत मोठ्या वाहनांना अयोध्येत मज्जाव आहे.