नवी देहली – भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज ‘एशियन-पॅसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन’च्या (‘एपीईसी’च्या) हवामान केंद्राने वर्तवला आहे. जागतिक तापमानवृद्धीमुळे (ग्लोबल वॉर्मिंगमुळे) जागतिक पातळीवर होणारे हवामान पालट आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा विपरित परिणाम, हा सध्या सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज ‘एपीईसी’ने वर्तवल्यामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळेल. भारतीय हवामान खात्याच्या अहवालातही ‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल’, असे नमूद करण्यात आले आहे.