सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या पोह्यामध्ये अळी आणि उपम्यामध्ये केस आढळले !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांच्या भोजनगृहांमध्ये यापूर्वी आळी, झुरळे आणि केस आढळून आले आहेत. ९ मार्च या दिवशी सकाळी विद्यार्थिनींना दिलेल्या पोह्यामध्ये अळी, तर उपम्यामध्ये केस दिसून आले. यावर विद्यार्थिनींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा घटना वारंवार घटना घडत असतात. अशा घटना घडल्यानंतर सर्व विद्यार्थी संघटना आवाज उठवतात. भोजनगृहाचा चालक पालटला जातो. नवीन माणूस येतो; परंतु जेवणाचा दर्जा निकृष्टच राहिला असल्याचे दिसून येते. विद्यापीठ भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीचे सदस्य राहुल ससाणे म्हणाले, ‘‘विद्यापिठाने या प्रश्नांवर कायमस्वरूपी मार्ग काढला पाहिजे. अन्यथा असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन विद्यार्थ्यांच्या जिवास धोका निर्माण झाला, तर त्याचे दायित्व विद्यापिठाचे असेल.’’

संपादकीय भूमिका :

विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न देणार्‍या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांची चौकशी करून कारवाई केव्हा होणार ?