हिंदु धर्मशास्त्राविषयी काडीचेही ज्ञान नसतांना वाटेल ती मागणी करून स्वतःचे अज्ञान पाजळणारे संवाद गोलमेज परिषदेतील पदाधिकारी-कार्यकर्ते !
कोल्हापूर – देशातील सर्व मंदिरांमध्ये स्त्रियांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा आणि त्यांची सरकारी पुजारी म्हणून नेमणूक करण्यात यावी, असा ठराव जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने भारतीय महिला मंच आयोजित राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या समतादी निवडक स्त्री-पुरुष यांच्या ‘संवाद गोलमेज परिषदे’त करण्यात आला. (मंत्रोच्चारांमुळे गाभार्यात पुष्कळ ऊर्जा निर्माण झालेली असते. त्यामुळे महिलांची पुजारी म्हणून नेमणूक झाल्यावर सातत्याने मंत्र म्हटल्याने त्या ऊर्जेचा महिलांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी महिला पुजारी नसतात. याचसमवेत मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांचा रजोगुण वाढलेला असतो. अशा स्थितीत महिलांनी गाभार्यात प्रवेश केल्यास त्यांना, तसेच इतरांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळेही महिला पुजार्यांची नेमणूक केली जात नाही. महिला पुजार्यांची नेमणूक करावी कि नाही ? हे ठरवण्याचा अधिकार हिंदु धर्मातील जगद्गुरु, शंकराचार्य, धर्मपंडित, संत यांना आहे. पुरोगामी किंवा नास्तिकतावादी असणार्यांना मंदिराविषयी बोलण्याचा काय अधिकार ? – संपादक)
संपादकीय भूमिका :अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवून देण्याविषयीचे वक्तव्य करण्याचे धाडस ‘संवाद गोलमेज परिषदे’चे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यामध्ये आहे का ? |