‘एम्.आय.आर्.व्ही.’ तंत्रज्ञानाच्या ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी !

जगात मोजक्या देशांकडेच आहे ‘एम्.आय.आर्.व्ही.’ (‘मल्टीपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल री-एंट्री व्हेइकल) तंत्रज्ञान !

भारताच्या स्वदेशी बनावटीचे ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्र

नवी देहली – भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत ही चाचणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली. हे क्षेपणास्त्र ‘मल्टीपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल री-एंट्री व्हीकल’ तंत्रज्ञानाद्वारे ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) विकसित केले आहे.

पंतप्रधान मोदी पोस्टद्वारे म्हणाले की, ‘मिशन दिव्यास्त्र’ यशस्वी झाल्याने आता एकाच क्षेपणास्त्राला विविध ठिकाणी अनेक युद्ध आघाड्यांवर तैनात करता येणार आहे. तसेच ही चाचणी यशस्वी झाल्याने भारत आता ‘एम.आय.आर्.व्ही.’ तंत्रज्ञान बाळगणार्‍या काही मोजक्या देशांच्या सूचीमध्ये समाविष्ट झाला आहे.

काय आहे वैशिष्ट्य !

सामान्य क्षेपणास्त्राद्वारे एका वेळी एकच अण्वस्त्र नेता येते आणि डागता येते; मात्र ‘मल्टीपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल री-एंट्री व्हेईकल’ या तंत्रज्ञानाद्वारे एकाच क्षेपणास्त्राद्वारे अनेक अण्वस्त्रे नेता येतात आणि वेगवेगळ्या लक्ष्यांवर डागता येतात, म्हणजेच एकाच क्षेपणास्त्राचा वापर करून अनेक अण्वस्त्रे आता भारताला डागता येणार आहेत.