छत्रपती संभाजीनगर – मनोज जरांगे पाटील यांनी २८ फेब्रुवारीला मराठा आरक्षणाचे आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ‘सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत. त्यामुळे मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित केले जात आहे. केवळ धरणे आंदोलन केले जाईल’, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष भरल्याची टीकाही त्यांनी केली. जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार चालू आहेत. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.”