संदेशखालीमध्ये (बंगाल) नौखालीची पुनरावृत्ती !

१. नौखालीप्रमाणे संदेशखालीतही हिंदु महिलांवर अत्याचार

‘बंगालमधील संदेशखालीच्या घटनांनी नौखालीच्या नरसंहाराच्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. वर्ष २०२४ मध्ये संदेशखालीमध्ये नेमके तेच घडत आहे, जे वर्ष १९४६ मध्ये नौखालीमध्ये घडले होते. (ही गोष्ट समजण्याठी आपल्याला पत्रकार प्रखर श्रीवास्तव यांचे पुस्तक ‘हे राम’ वाचले पाहिजे. ज्यात बांगलादेशाचा भाग बनलेल्या नौखालीमध्ये झालेल्या नरसंहाराविषयी अशा अनेक खर्‍या गोष्टी उघड केल्या आहेत, ज्या भारताच्या हिंदूंपासून आतापर्यंत दडवून ठेवल्या होत्या.) नौखालीचा सूत्रधार सुफी पीर गुलाम सर्वर होता. जो ‘मुस्लीम लीग’चाही नेता होता. संदेशखालीचा सूत्रधार शहाजहा शेख आहे. तोही स्थानिक सुफी दर्ग्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. तो तृणमूल काँग्रेसचा नेता आहे. नौखालीमध्ये गुलाम सर्वर याने ‘हिंदूंच्या बायका सुंदर असतात’, असे विधान केले होते. त्यानंतर हिंदूंच्या विरोधात बलात्कार, हत्या आणि लूटमार यांचे सत्र चालू झाले होते. संदेशखालीमधून ज्या बातम्या येत आहेत, त्यानुसार शहाजहा शेख आणि तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या चिथावणीचे कारणही सुंदरताच आहे. नौखालीमध्येही मौलवींनी हिंदु महिलांना बक्षिसांप्रमाणे आपांपसात वाटले. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले. त्यांची दृष्टी अल्पवयीन मुलींवर रहात होती. संदेशखालीच्या महिलांनी जे आरोप लावले आहेत, त्यातही हीच पद्धत स्पष्टपणे दिसून येत आहे. नौखालीमध्ये सर्व हिंदूंना इस्लामचा स्वीकार करण्यास सिद्ध रहाण्यास सांगितले होते. संदेशखालीचा संदेशही हाच आहे की, इस्लाम स्वीकारल्याखेरीज या अत्याचारांपासून सुटका होणार नाही. नौखालीत हिंदु महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये धर्मांध महिलांनी सहकार्य केल्याची उदाहरणे सापडतात. संदेशखालीमध्येही काही प्रमाणात तसेच घडतांना दिसत आहे.

२. संदेशखालीतील अत्याचारांवर धर्मनिरपेक्षवादी गप्प का ?

इतक्या मोठ्या संख्येने हिंदु महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे; परंतु मुसलमानांकडून कुणी बोलणारे नाही. नौखाली हत्याकांडाच्या वेळी म. गांधीजींची प्रतिक्रिया सर्वांत विचित्र होती. ते हिंदूंना साहाय्य करण्याऐवजी त्यांना आत्महत्या करण्याच्या पद्धत सांगत होते. त्यांच्यासाठी हा फार गंभीर विषय नव्हता. संदेशखालीमध्ये ही भूमिका कोण पार पाडत आहे ? हे तुम्हालाच ठरवायचे आहे. नौखालीचा सूड हिंदूंनी बिहारमध्ये घेतला होता. जसे बिहारमध्ये हिंसाचाराच्या घटना चालू झाल्या, तसे तेथे गांधीजी पोचले आणि हिंदूंना शांती अन् अहिंसा यांचे धडे द्यायला लागले. संदेशखाली आणि बंगाल येथे होत असलेल्या अत्याचारांविषयी हिंदु समाज निराशेच्या त्या सीमेपर्यंत जाऊन पोचला आहे की, तो यावर कोणती तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त करत नाही; पण चुकून एखादी घटना घडली, तर देशातील संपूर्ण ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्था जागृत होईल. न्याययंत्रणा संदेशखालीच्या घटनांना फार गंभीर समजत नाही, पुढे तिनेही स्वत: लक्ष घालून गोंधळ चालू केल्यास आश्चर्य काय ?

३. संदेशखालीच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !

स्वातंत्र्यानंतर भारताच्या धोरणे करणार्‍या निर्मात्यांनी नौखालीतून धडा घेतला असता, तर आज संदेशखाली घडले नसते. नौखालीमध्ये लक्षावधी हिंदूंच्या नरसंहाराला इतिहासाच्या पुस्तकांमधूनही गायब केले आहे; कारण लोकांना कळू नये की, ‘गंगा-जमुना तहजीब’ (हिंदु-मुसलमानांचे कथित ऐक्य) आणि उदार सुफीवादाच्या आडून काय चालू आहे ? संदेशखालीच्या घटना सांगतात की, गेल्या ७६ वर्र्षांत या देशात काहीच पालटले नाही. नौखाली असो कि संदेशखाली हे काही अपवाद नाहीत. देशाच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये अशा वस्त्या बसवल्या गेल्या आहेत, जेथे हिंदूंचे असणे, म्हणजे ‘सेक्युलरिझम्’च्या विरुद्ध आहे. या व्यवस्थेविरुद्ध आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्यासमवेतही याची पुनरावृत्ती होणार आहे.’

(साभार : ‘इंडिक्स ऑनलाईन’ सामाजिक संकेतस्थळ)