मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देणार्या एका अज्ञात व्यक्तीला २४ फेब्रुवारी या दिवशी अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या व्यक्तीने सामाजिक माध्यमांवरून मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकाधमकी देणार्यांचा पुरता बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पावले उचलणार ? |