कोल्हापूर – सातारा ते कागल राज्य महामार्गाच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम चालू आहे. हाच रस्ता चारपदरी करतांना अनेक चुका झाल्या आणि त्यांचा त्रास आजूबाजूच्या अनेक गावांना गेली २० वर्षे होत आहे. पूर्वी या भागातील पूल उंचीला लहान केल्याने शेतकर्यांना उसाची ट्रॉली लांब फिरवून परत खाली यावे लागते. हीच समस्या गणेशोत्सव मंडळांनाही येते, तसेच या पुलावर अनेक वेळा वाहतूककोंडी होते. हे काम चालू होण्यापूर्वीच माळीवाडा पुलाची उंची वाढवावी, असे निवेदन देऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही झाली. त्यामुळे माळीवाडा पुलाची उंची, रूंदी वाढवण्यात, यावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राज्य महामार्गावर निदर्शने करण्यात आली.
या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, दीपक रेडेकर, सुनील पोवार, विक्रम चौगुले, दीपक पाटील, महेश जाधव, विराग करी, संतोष चौगुले, सुनील चौगुले यासंह अन्य उपस्थित होते.