मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा इतिहास महाराष्ट्र शासन प्रकाशित करणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई – महाराष्ट्राबाहेर मराठा साम्राज्याच्या झालेल्या विस्तार पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. लवकरच हा इतिहास प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

अहिल्याबाई होळकर यांचे इंदोर (मध्यप्रदेश) येथील राजघराणे, शिंदे यांचे ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील राजघराणे, भोसले घराण्याचे तंजावर (आंध्रप्रदेश) येथील घराणे आदींनी महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषेचा प्रसार केला. या घराण्यांमुळे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषेचा प्रसार झाला आणि त्या भागात आजही मराठी भाषा बोलली जात आहे. भावी पिढीला याविषयीची माहिती व्हावी, यासाठी या इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. संबंधित राज्यांशी समन्वय करून याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यात येईल. साधारण दीड सहस्र वर्षांपूर्वी दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये भारतीय संस्कृतीचा झालेल्या प्रसार याचाही पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासह उत्कृष्ट अशा १०० साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन राज्यशासनाकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी दीपक केसरकर यांनी दिली.