भारताच्या सीमा एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतच्या, म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे २ सहस्र ९३३ किलोमीटर आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे ३ सहस्र २१५ किलोमीटर आहे. ही सीमा विविध देशांशी जोडलेली आहे. भारताच्या इतर देशांशी जोडलेल्या भूसीमा १५ सहस्र २०० कि.मी. आणि समुद्री किनारपट्टी ७ सहस्र ५१६ हून अधिक कि.मी. आहे. भारताची सीमा कोणत्या देशाशी किती किलोमीटर जोडलेली आहे, ते येथे देत आहोत.
भारताची १५ सहस्र २०० कि.मी. भूसीमा १७ राज्यांच्या ८२ जिल्ह्यांमधून जाते. त्याच वेळी किनारपट्टी ७ सहस्र ५१६ हून अधिक कि.मी. असून ती १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जाते. भारताची सीमा अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि चीन या ७ देशांशी जोडलेली आहे.
किती राज्यांत किती किलोमीटर सीमा ?
१. बांगलादेश हा एकमेव देश आहे, ज्याच्याशी भारताची लांब सीमा आहे. या देशासोबत भारताची ४ सहस्र ९६ किलोमीटर लांबीची सीमा आहे. ती बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांतून जाते.
२. भारताची चीनसोबत ३ सहस्र ४८८ किलोमीटरची सीमा आहे. ती अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश लडाख या राज्यांमधून जाते.
३. भारताची बहुतांश सीमा पाकिस्तानला लागून असून ती ३ सहस्र ३२३ किलोमीटर लांबीची आहे. ती गुजरात, राजस्थान, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर अन् लडाख या राज्यांमधून जाते.
४. भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही सहज पोचता येते. भारताचे नेपाळशी चांगले संबंध आहेत; पण सीमा वाटपाविषयी काही ठिकाणी वाद आहेत. भारताची नेपाळसोबत १ सहस्र ७५१ किलोमीटरची सीमा आहे. ती उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल आणि सिक्कीम राज्यांतून जाते.
५. भारताची म्यानमारसोबत १ सहस्र ६४३ किलोमीटरची सीमा आहे. ही सीमा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर आणि मिझोराम या राज्यांतून जाते.
६. भारताची भूतानसोबत ६९९ किलोमीटरची सीमा आहे. सिक्कीम, बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधून ही सीमा जाते. भारत आणि भूतान यांच्यात उत्तम संबंध आहेत. वर्ष १९७१ मध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांमुळेच भूतान संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला.
७. अफगाणिस्तानची भारतासोबत १०६ किलोमीटरची सीमा आहे. केंद्रशासित प्रदेश लडाखमधून ही सीमा जाते.
(साभार : विविध संकेतस्थळे)