अभाविप पुणे महानगर आणि अन्य संघटना यांच्या वतीने पुणे येथे निषेध मोर्चा !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ‘ललित कला केंद्र गुरुकुल विभागा’च्या वतीने आयोजित नाटकामध्ये प्रभु रामचंद्र आणि सीतामाता यांच्याविषयी अपशब्द काढले गेले अन् त्यांची विटंबना करण्यात आली. या प्रकारातील दोषींवर पोलीस कारवाई करण्यात आली; पण अजूनही विद्यापिठाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे समस्त हिंदु बांधवांकडून पुणे विद्यापिठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. अभाविप, पुणे महानगर आणि अन्य संघटना यांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.