आळंदी येथे उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात ग्रंथ शोभायात्रा !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्त…

गीताभक्ती अमृत महोत्सवातील ग्रंथ शोभायात्रेत डोक्यावर ‘श्री ज्ञानेश्वरी’ ग्रंथ घेऊन सहभागी झालेले प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

आळंदी, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आळंदी गावातील मुख्य मार्गावरून ग्रंथ शोभायात्रा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात काढण्यात आली. या शोभायात्रेत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी डोक्यावर ‘श्री ज्ञानेश्वरी’ ग्रंथ ठेवला होता.

ग्रंथ शोभायात्रेत सहभागी शंखपथक

या यात्रेत पारंपरिक वेशभूषेत बालचमू, वारकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी यात्रेची सांगता झाली. त्यानंतर प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी ‘श्री ज्ञानेश्वरी’ ग्रंथांचे विधीवत् पूजन केले.

ग्रंथ शोभायात्रेत सहभागी झालेले वारकरी