मुंबई महापालिका महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ॲप’ सिद्ध करणार !

मुंबई – महापालिकेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ॲप’ सिद्ध केले जाणार आहे. संकटात असणार्‍या महिलांना ‘ॲप’मुळे तात्काळ साहाय्य मिळेल, अशी यंत्रणा उभी केली जाणार आहे. ॲपच्या साहाय्याने महिला पोलीस, पालिका किंवा सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क साधू शकेल. महिलांना कौटुंबिक हिंसाचारासह विनयभंग, छेडछाड, चोरीसाठी मारहाण यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना किंवा समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी वरील कुणाशीही संपर्क केल्यास गस्ती पथक साहाय्य करील. या मोहिमेसाठी महापालिकेने १०० कोटी रुपये इतके प्रावधान केले आहे.