स्वच्छतेसंबंधीची असंवेदनशीलता !

श्री. श्रीराम खेडेकर

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि श्रीराममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त बहुतांश मंदिरांत स्वच्छता अन् सुशोभीकरण करण्याचे पंतप्रधान मोदींनी घोषित केले होते. ते स्वतःही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. त्या दिवशी काही मंदिरांत भेट देण्याचा योग आला. एका मंदिरात स्वच्छतेबद्दल कमालीची अनास्था पहायला मिळाली. मंदिराच्या मंडपात छानपैकी मोठी रांगोळी घातली होती; परंतु रांगोळीच्या आसपास सर्वत्र धूळ होती. त्यामुळे रांगोळी घातली असली तरी, त्याचा चांगला परिणाम जाणवला नाही. तेथील मंदिरातल्या कर्मचारीवर्गाची स्वच्छतेबद्दल कमालीची अनास्था दिसून आली. स्वच्छतेचा जो दृष्टीकोन असायला हवा, संवेदनशीलता असायला हवी होती, ती संवेदनशीलताच कर्मचार्‍यांमध्ये अल्प असल्याचे जाणवले.

–  श्री. श्रीराम खेडेकर, बांदोडा, फोंडा, गोवा.