ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा हिंदु मंदिर पाडून बांधण्यात आल्याने याचे सर्वेक्षण करा ! – राजवर्धन सिंह परमार, राष्ट्रीय अध्यक्ष,, महाराणा प्रताप सेना

महाराणा प्रताप सेनेची राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

राजवर्धन सिंह परमार

अजमेर (राजस्थान) – येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्गा पूर्वी हिंदु मंदिर होते. हा दर्गा हिंदु मंदिर पाडून बांधण्यात आला आहे, ज्याचा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे सर्व काही उघड होईल. या सर्वेक्षणासाठी  राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडेही चौकशीची मागणी केली होती आणि सध्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडेही आम्ही हीच मागणी केली आहे, असे महाराणा प्रताप सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजवर्धन सिंह परमार यांनी सांगितले. त्यांनी चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले आहे.

सौजन्य एफ ३ न्यूज 

राजवर्धन सिंह परमार म्हणाले की, राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काढण्यात आलेल्या ‘जन जागरण यात्रे’मध्ये अनेकांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. अयोध्येतील बाबरी आणि वाराणसीतील ज्ञानवापी मशिदींप्रमाणेच अजमेरच्या दर्ग्याचीही चौकशी करून आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमान आक्रमकांनी भारतातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मशिदी किंवा दर्गे बांधले. ती मंदिरे परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गांनी प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्रातील भाजप सरकारने ही मंदिरे परत हिंदूंना मिळण्यासाठी कायदा करावा !