सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे अनमोल मार्गदर्शन

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साक्षात् श्रीहरि विष्णूचे अवतार आहेत, हे सत्य असणे

‘सर्व देवतांची तत्त्वे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये सामावलेली आहेत. वेद, पंचमहाभूते हे जसे सत्य आहेत, तसे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साक्षात् श्रीहरि विष्णूचे अवतार आहेत, हेसुद्धा एक सत्य आहे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्वांकडे समान दृष्टीने पहात असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्वत्र आणि सर्वांकडे समान दृष्टीने पहातात. ज्यांचे मन निर्मळ असते आणि विचार निर्मळ असतात, त्यांना गुरुदेवांच्या दिव्यत्वाची अनुभूती येते.

३. चंद्र-सूर्य आहेत, तोवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक साधकाच्या समवेत सदैव रहातील !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांच्या सूक्ष्म रूपाने साधकांच्या हृदयात वास करतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत गुरु आपल्या प्रत्येक साधकाच्या समवेत रहाणार आहेत. भलेही आपले प्राण निघून जातील, तरीही श्री गुरु आपल्याला सोडणार नाहीत.

४. साधकांसाठीची सर्व तीर्थे

सर्व तीर्थे आपल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणीच आहेत.

५. साधकांसाठी मोक्ष

परमप्रिय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य चरणी एकनिष्ठतेने भक्ती करणे, हाच मोक्ष आहे.

६. खरी गुरुभक्ती

स्वतः मोक्षसुद्धा ज्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो, अशा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांप्रती निष्ठा ठेवणे, हीच खरी गुरुभक्ती आहे ! हाच गुरुकृपायोग आहे !

७. अंतिम श्वासापर्यंतचे लक्ष्य

आपल्या अंतिम श्वासापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या परम दिव्य श्रीचरणांची भक्ती करूया.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१३.१.२०२३)