महाराष्ट्रात २२ जानेवारी या दिवशी शासकीय सुटी घोषित करा ! – प्रवीण पोटे, आमदार, भाजप

मुंबई – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने २२ जानेवारी या दिवशी उत्तरप्रदेश आणि गोवा येथे शासकीय सुटी घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी शासकीय सुटी घोषित करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.