पूर्वीच्या काळी पहाटे जात्यावर दळण दळतांना स्त्रिया ओव्या गात असत. या ओव्यांमध्ये भगवंताचे स्मरण किंवा त्याला आळवणे हा मुख्य उद्देश असायचा. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी अशाच ओव्या लिहिल्या आहेत. या ओव्यांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, संत आणि साधक यांचा उल्लेख आहे. त्यांच्यात या सर्वांप्रती असणारा भाव या ओव्यांतून लक्षात येतो.
हळदी-कुंकवाने तुळस लाल केली ।
गुरुदेवांची जन्मपत्रिका सूर्यनारायणाने लिहिली ।। १ ।।
दत्त-महादेवाला नंदी प्रिय, गुरु दत्तात्रेयांना प्रिय गाय ।
मला प्रिय सद्गुरुदेवांचे पाय ।। २ ।।
साधक चालले पायी ।
गुरुदेव बसले मेण्यात (रथात)।। ३ ।।
(मेणा म्हणजे पालखी; पण इथे त्यांना रथोत्सवाचे दृश्य दिसले.)
साधकांच्या डोक्यावरी कृष्णाची सावली ।
गुरुदेवांना जन्म देणारी धन्य धन्य ती माऊली ।। ४ ।।
रामनाथीच्या आश्रमात समई लावली मोराची ।
तिथं बैठक थोरांची, गुरुदेव अन् संत मंडळीची ।। ५ ।।
सूचना : ओवीतील गुरुदेव, सद्गुरुदेव हे शब्द सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उद्देशून म्हटले आहेत.
– श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |