रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील व्याख्यान !
ठाणे – भारताचा अमृतकाळातून सुवर्णकाळात प्रवेश होत आहे, तसेच देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. भारत विकसित राष्ट्र झाल्यासच त्यातून राष्ट्रपूजा होणार आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा क्रीडा अन् युवक कल्याण मंत्री अनुरागसिंह ठाकुर यांनी म्हटले आहे. येथे चालू असलेल्या ३८ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘रामपूजा ते राष्ट्रपूजा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
सौजन्य डीडी सह्याद्री न्यूज
अनुरागसिंह ठाकूर पुढे म्हणाले,
१. सर्व धर्म, जाती आणि संप्रदाय यांना जोडून ‘सबका साथ, सबका विश्वास’ या संकल्पनेतून रामराज्य स्थापन करायचे आहे. राम हे एकात्मता आणि मानवतावाद यांचे प्रतीक आहे.
२. श्रीरामाची पूजा, म्हणजेच राष्ट्रपूजा आहे. गरीब-वंचितांच्या कल्याणासाठी गेल्या ९ वर्षांत पुष्कळ काम झाले. हे श्रीरामाच्या आशीर्वादानेच शक्य झाले.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल.