आहारात मांस असल्याचा कोणताही उल्लेख स्वतः प्रभु श्रीरामांनी केलेला नाही !

‘वैदिक आणि अवैदिक’ हा अनावश्यक वाद निर्माण करणार्‍या एका सद्गृहस्थांनी ‘वाल्मीकि रामायणा’च्या अयोध्याकांडातील म्हटलेला श्लोक येथे देत आहे. त्यांनी तो रामाच्या मांसभक्षणाचा संदर्भ असल्याचे म्हटले आहे.

वैद्य परीक्षित शेवडे

इदं मेध्यमिदं स्वादु निष्टप्तमिदमग्निना।
एवमास्ते स धर्मात्मा सीतया सह राघवः ।।

– वाल्मीकि रामायण, कांड २, सर्ग ९६, श्लोक २

अर्थ : धर्मात्मा राघव सीतेसह या प्रकारे गोष्टी करत होते, ‘प्रिये ! हे फळ परम पवित्र आहे. ते पुष्कळ स्वादिष्ट आहे. तसेच हा कंद विस्तवावर चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे.’

लक्षात घेण्याची गोष्ट, म्हणजे ‘बडोदा ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट’ने प्रकाशित केलेल्या ‘वाल्मीकि रामायण’ संपादित प्रतीत या दोन्ही श्लोकांचा मूळ ग्रंथात समावेश नाही. याला कारण त्यांनी भारतभरातून मिळवलेल्या ४३ हस्तलिखितांपैकी केवळ ५ हस्तलिखितांतच हे श्लोक आढळल्याने ते प्रक्षिप्त असण्याची, म्हणजेच मूळ रामायणात मागाहून कुणीतरी घुसडले असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या प्रतीत पुढील श्लोकाने सर्गाचा प्रारंभ होतो –

तथा तत्राऽसतस्तस्य भरतस्योपयायिनः।
सैन्यरेणुश्च शब्दश्च प्रादुरास्तां नभस्पृशौ ।।

– वाल्मीकि रामायण, कांड २, सर्ग ९६, श्लोक ३

अर्थ : या प्रकारे ते त्या पर्वतीय प्रदेशात बसलेलेच होते की, इतक्यात त्यांच्याजवळ येणारी भरताची सेना धूळ उडवत आणि कोलाहल करत एकदमच प्रकट झाली अन् (धूळ आणि कोलाहल) आकाशात पसरवू लागली.

उपस्पृशंस्त्रिषवणं मधुमूलफलाशनः ।
नायोध्यायै न राज्याय स्पृहये च त्वया सह ।।

– वाल्मीकि रामायण, कांड २, सर्ग ९५, श्लोक १७

अर्थ : राम सीतेला म्हणतात, ‘तू सोबत असल्याने ३ वेळा स्नान करून संध्यावंदन करत, तसेच मध, फळे आणि कंदमुळे खात दिवस व्यतित करत असता मला अयोध्येच्या राज्यपदाची कोणतीही कमतरता जाणवत नाही.’

थोडक्यात इथेही राम स्वतःच्या आहारात मांस असल्याचा कोणताही उल्लेख करत नाहीत.

…जाणीवपूर्वक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न !

पुन्हा एकदा ‘राम शाकाहारी कि मांसाहारी ?’, हा सद्यःस्थितीत अत्यंत गौण मुद्दा आहे. महत्त्वाचे सूत्र हे आहे की, हिंदुजन एकत्र येत असतांना हा मिठाचा खडा जाणीवपूर्वक टाकला जात आहे; पण तसे करतांना आपल्या धर्मग्रंथांची अवहेलना होत आहे. वरवर अभ्यासक असल्याचे दाखवणारे अनेक लोक किती सोयीने अर्धवट संदर्भ आपल्यासमोर ठेवत असतात. असे असले, तरी आपण मात्र २२ जानेवारीच्या ‘रामदिवाळी’ची जोरदार सिद्धता करूया.’

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (६.१.२०२४)