प्रभु श्रीरामाने स्वतः सांगितले आहे, ‘मी फलमुलांवर जगणारा आहे !’

‘शूर्पणखा जेव्हा १४ राक्षस घेऊन प्रभु रामाशी संग्राम करायला आली, तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाले, ‘‘तू जरा सीतेजवळ थांब, मी पुढे जातो आणि शूर्पणखेने सोबत आणलेल्या राक्षसांचा वध करतो.’’

श्री. पार्थ बावस्कर

श्रीरामाने धनुष्याला प्रत्यंच्या चढवली आणि पुढे सरसावत ते त्या १४ राक्षसांना म्हणाले, ‘‘आम्ही दशरथाचे पुत्र भ्राते राम आणि लक्ष्मण आहोत, सोबत माझी पत्नी सीता आहे. आम्ही तिघे या गहन दंडकारण्यात आलो आहोत. आम्ही जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी आहोत आणि महत्त्वाचे म्हणजे फलमुलांवर उपजीविका करून रहात आहोत !

पुत्रौ दशरथस्यावां भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
प्रविष्टौ सीतया सार्धं दुश्चरं दण्डकावनम् ।।
फलमूलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
वसन्तौ दण्डकारण्ये किमर्थमुपहिंसथ ।।

– वाल्मीकि रामायण, काण्ड ३, सर्ग २०, श्लोक ७ आणि ८

अर्थ : आम्ही दोघे भाऊ राजा दशरथांचे पुत्र राम आणि लक्ष्मण आहोत, तसेच सीतेसह या दुर्गम दण्डकारण्यात येऊन फल-मूलाचा आहार करत इंद्रिय संयमपूर्वक तपस्येमध्ये संलग्न आहोत आणि ब्रह्मचर्याचे पालन करत आहोत. या प्रकारे दंडकवनात रहाणार्‍या आम्हा दोघा भावांची तुम्ही कशासाठी हिंसा करू इच्छित आहात ?

यात राम स्वतः सांगतो की, मी फलमुलांवर जगणारा अर्थात् शाकाहारी आहे ! कुणी काहीही म्हणू दे; पण हे सत्य सर्वत्र सांगा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ‘जित्या’ची खोड मेल्याखेरीज जात नसते !’

जय श्रीराम !

– श्री. पार्थ बावस्कर, सावरकरप्रेमी (४.१.२०२३)