राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण !

जळगाव – अमळनेर येथे २, ३ आणि ४ फेब्रुवारी या दिवशी होणार्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना, तर समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास अन् पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी एका बैठकीत दिली. ते स्वतः अमळनेर येथे संमेलनाची सिद्धता पहाण्यासाठी आले होते. या बैठकीला माजी आमदार शिरीष चौधरी, मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्री. श्यामकांत भदाणे, श्री. रमेश पवार, कार्यवाह श्री. नरेंद्र निकुंभ, श्री. शरद सोनवणे, श्री. प्रदीप साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !