|
मुंबई : ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या कार्यालयात ‘खिलाफत इंडिया’ या संगणकीय पत्त्यावरून ११ ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी मिळाली होती. यात ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह एच्.डी.एफ्.सी. बँक आणि आयसीआयसीआय बँक येथेही बाँब ठेवल्याचे नमूद करून ‘दुपारी दीड वाजता बाँबस्फोट होईल’, असे म्हटले होते.
या प्रकरणी पोलिसांनी शोध घेतला असता आक्षेपार्ह असे काहीही सापडलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.