पाटलीपुत्र (बिहार)- यू ट्यूब चॅनल चालवणारे मनीष कश्यप यांची पाटणा उच्च न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. १२ मार्च २०२३ या दिवशी रेल्वेमध्ये हातकडी घातलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याने कश्यप यांना अटक करण्यात आली होती. ९ मासांनंतर त्यांना जामीन देण्यात आला.