सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका स्वीकारली !

२४ जानेवारी २०२४ या दिवशी निकाल देणार

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका (क्युरेटिव्ह पिटीशन) स्वीकारली असून २४ जानेवारी २०२४ या दिवशी या संदर्भात निकाल देण्यात येईल, असे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘मला विश्‍वास आहे की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे.’’

मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी; म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. सरन्यायाधीश आणि अन्य ३ न्यायाधीश यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.