मुंबई – तडीपार आरोपी गोरेगाव येथे एका व्यक्तीला मारहाण करत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी आले; मात्र आरोपीने पोलीस पथकावरही आक्रमण केले. त्याने पोलिसांना मारहाण केली आणि फरशीचा तुकडा पोलिसांवर फेकला. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी २३ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्या विरोधात यापूर्वी चार गुन्हे नोंद असून दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये १ वर्षासाठी त्याला तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर त्याने मुंबईत येऊन पुन्हा गुन्हा केला.
संपादकीय भूमिका :कुणीही येतो आणि पोलिसांवर आक्रमण करतो, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था यांचा धाकच उरला नसल्याचे लक्षण होय ! |