शासनाची भूमी भाडेपट्ट्यांवर घेऊन शासनाची आर्थिक फसवणूक होत आहे ! – राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री

राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री

नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील स्वयंसेवी संस्था भाडेपट्टा तत्त्वांवर भूमी घेऊन त्यांचा अपलाभ घेतात. मनमानी करून नियमांची पायमल्ली करत शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच भाडेपट्टा तत्त्वांवर दिलेल्या जागांची पडताळणी महसूल विभागाकडून करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केले.

मुंबईतील माझगाव विभागातील भूखंड स्वयंसेवी संस्था आणि तत्सम संस्थांना भाडेतत्त्वावर दिलेल्या भूमींचा अपलाभ घेत असल्याविषयीची लक्षवेधी आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केली होती.